Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन

ईनाडू आणि रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे आज निधन झाले. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. शनिवारी पहाटे 3.45 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

रामोजी राव यांच्यावर हैदराबादमधील स्टार रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते, मात्र पाच जून रोजी तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना हार्ट संबंधी समस्या होती. तसेच श्वास घेण्यासही त्रास होत होता. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

रामोजी राव यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र यांच्यासह केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आहे. रामोजी राव यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. तेलुगू मीडिया आणि पत्रकारितेमध्ये त्यांचे योगदान कौतुकास्पद असून आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत, असे जी किशन रेड्डी यांनी म्हटले.

रामोजी राव हे यशस्वी उद्योजक, चित्रपट निर्माते होते. तेलुगू माध्यमक्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्याचे पूर्ण नाव चेरुकुरी रामोजी राव होते. त्यांचा जन्म 16 नोव्हेंबर, 1936 रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. पद्मविषूणाने सन्मानित रामोजी राव यांनी हैदराबादमध्ये रामोजी ग्रुपची स्थापना केली होती. या ग्रुपने जगातील सर्वात मोठा स्टुडिओ, रामोजी फिल्म सिटी, ईटीव्ही नेटवर्क आणि चित्रपट निर्माती कंनी उषा किरण मुव्हीजची स्थापना केली. यासह मार्गदर्श चिटफंड, डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स, कालंजली शॉपिंग मॉल, प्रिया पिकल्स आणि मयुरी फिल्म डिस्ट्रिब्यूटर्स या व्यवसायांमध्येही रामोजी राव यांनी हात आजमावला होता.