डॉलर बदलून देतो असे सांगून ज्वेलर्सची फसवणूक प्रकरणी बिनांग व्यासला बोरिवली पोलिसांनी अटक केली.
तक्रारदाराला मे महिन्यात एकाने फोन करून डॉलरची मागणी केली. त्याला डॉलर घेऊन शिंपोली येथे बोलावले. तक्रारदार यानी त्याच्या कामगाराला डॉलर घेऊन पाठवले. ठरल्यानुसार त्याचा कामगार तेथे गेला. तेव्हा त्याने एकाला डॉलर दिले. डॉलरच्या मोबदल्यात पावणे सहा लाख रुपये घेऊन येतो असे सांगून एक जण पळाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्याने याची माहिती तक्रारदार याना दिली. तक्रारदार याने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.