खड्डे बुजवण्यासाठी फक्त दोन दिवसांचा अल्टीमेटम; अन्यथा कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई

कोकणात दाखल झालेला मान्सून कोणत्याही क्षणी मुंबईत बरसायला सुरुवात होण्याची शक्यता असल्यामुळे 10 जूनपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्ते वाहतूक योग्य करा, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदार आणि संबंधित पालिका अधिकाऱयांना दिले आहेत. याकडे दुर्लक्ष होऊन मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागल्यास कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुंबईत सुरू असलेली रस्त्याची कामे 10 जूनपर्यंत ‘सेफ स्टेज’मध्ये आणून रस्ते वाहतूक योग्य करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहेत. यानुसार अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी आज पुन्हा संबंधित अधिकाऱयांची बैठक घेऊन रस्त्याची कामे आणि खड्डय़ांबाबत आढावा घेतला. पालिकेच्या अखत्यारितील रस्त्यांवर पावसाळ्यादरम्यान खड्डे आढळतात किंवा रस्त्यांची डागडुजी करावी लागते. ही शक्यता लक्षात घेऊन महानगरपालिकेच्या रस्ते व वाहतूक खात्याद्वारे वेळोवेळी आवश्यक ती कार्यवाही नियमितपणे केली जाते. एखाद्या ठिकाणी खड्डे आढळल्यास ते भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करता यावी यादृष्टीने नागरिकांनादेखील सहज-सुलभ पद्धतीने खड्डेविषयक तक्रार नोंदवता यावी यासाठी महानगरपालिकेने पारंपरिक पद्धतीने लेखी तक्रार करण्यासह

या ठिकाणी करा तक्रार

महानगरपालिकेच्या अखत्यारीतील खड्डेविषयक तक्रार करावयाची असल्यास ती ‘1916’ या दूरध्वनी क्रमांकावर करता येईल. हा दूरध्वनी क्रमांक 24 तास अव्याहतपणे कार्यरत असतो. मुंबई महानगरपालिकेच्या  mybmc (माय बीएमसी) या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटला टॅग करून देखील नागरिक खड्डेविषयक तक्रार नोंदवू शकतात. कोणत्याही खड्डय़ाची तक्रार आल्यानंतर 24 तासांत खड्डा बुजवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.