घोषणांचा पाऊस पाडण्यासाठी अधिवेशन लांबणीवर

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिंदे-फडणवीस सरकारला हादरा बसला आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभेच्या पराभवाची पुरावृत्ती होण्याची चिन्हे आहेत. त्यापूर्वीच लोकप्रिय घोषणा करण्याची तयारी सरकारने केली आहे. राज्यसभा व विधान परिषदांच्या निवडणुकांची प्रक्रिया 26 जूनपर्यंत संपुष्टात येईल. त्यानंतर आचारसंहितेत काही अंशी सूट मिळाल्यावर विधिमंडळाच्या अधिवेशनात लोकप्रिय घोषणा करता येतील अशी अटकळ बांधून सरकारने पावसाळी अधिवेशन 27 जूनपर्यंत पुढे ढकल्याचे सांगण्यात येते.