
घरालगत असलेल्या विजेच्या खांबावर स्पार्किंग झाल्याने तीन घरे जळाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील नान्होरी (दिघोरी) येथे घडली. यात घरगुती साहित्य,रोख रक्कम,10 ग्रॅम सोने व जनावरांचा गोठा जळाला.आगीत एका गायीच्या वासराचा होरपळून मृत्यू झाला आहे. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही. तिन्ही घरांचे मिळून 4 लाखांवर नुकसान झाले. या घटनेमध्ये तारकेश्वर रामकृष्ण उरकुडे यांचे 2 लाख 65 हजार, विलास मारोती उरकुडे यांचे 65 हजार 500 शेवंता विठ्ठल उरकुडे यांचे 63 हजार 500 असे एकूण 3 लाख 94 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.