नरेंद्र मोदी 9 जूनला घेणार पंतप्रधानपदाची शपथ, NDA च्या बैठकीआधी भाजप नेत्याची माहिती

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एनडीएतील घटक पक्षांची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीपूर्वी भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी नरेंद्र मोदी 9 जून रोजी सायंकाळी 6 वाजता पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याची माहिती दिली. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान होतील.

संसदेमध्ये एनडीएच्या घटकपक्षांची बैठक सुरू आहे. या बैठकीला एनडीएचे खासदार उपस्थित आहेत. याच बैठकीत संसदील दलाचा नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्तावर राजनाथ सिंह यांनी ठेवला. या प्रस्तावाला अमित शहा यांनी अनुमोदन दिले.

नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एनडीएतील प्रमुख नेत्यांनी मोदी यांच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आंध्र प्रदेशचे नेते तथा टीडीएस पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीदेखील मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला.