सरकार बनण्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जाहीर; खिशावर किती पडणार ताण? वाचा सविस्तर…

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून तीन दिवस झाले आहेत. 4 जून रोजी पार पडलेल्या मतमोजणीत एनडीएला 293 जागा, तर इंडिया आघाडीला 233 जागा मिळाल्या. त्यानंतर दिल्लीत नवीन सरकार बनवण्याच्या कवायती सुरू आहेत. पुढील आठवड्यापर्यंत दिल्लीत नवीन सरकार स्थापन होईल. मात्र तत्पूर्वीच तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या नवीन किंमती जारी केल्या आहेत.

तेल कंपन्यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वसामान्यांना दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किंमती देशभरात 2 रुपयांनी कमी केल्या होत्या. मात्र ऐन निवडणुकीवेळी केलेल्या या कपातीचा विशेष फायदा सत्ताधाऱ्यांना झाला नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याच्या प्रतिक्रिया त्यावेळी उमटल्या होत्या.

आता निवडणूक पार पडल्यानंतर तेल कंपन्यांनी नवीन दर जारी केले आहेत. देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे टाकी फूल करण्याआधी तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहेत हे जाणून घ्या.

एचपीसीएलच्या वेबसाईटवर देशभरातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर देण्यात आलेले आहेत. त्यानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लीटर 94.76 रुपये, तर डिझेल 87.66 रुपये प्रति लीटर मिळत आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लीटर 104.19 रुपये, तर डिझेलचा दर 92.13 रुपये प्रति लीटर आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 103.93 रुपये, तर डिझेलची किंमत 90.74 रुपये प्रति लीटर आहे. चेन्नईत पेट्रोल 100.73 रुपये, तर डिझेल 92.32 रुपये प्रति लीटर मिळत आहे. आयटी हब बनललेल्या  बंगळुरूमध्ये पेट्रोलचे दर प्रति लीटर 99.82, तर डिझेलचे दर 85.92 रुपये प्रति लीटर आहेत.