कोणालाही कॉल करायचा… तुमच्या वडिलांकडून काही उसने पैसे घेतलेत ते तुम्हाला द्यायला सांगितलेत असे सांगून ठराविक रक्कम पाठवायची. मग चुकून जास्त पैसे पाठवले गेल्याचे खोटे संदेश बनवून समोरच्यांची आर्थिक फसवणूक करणाऱया एका भामटय़ाला डी. बी. मार्ग पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या.
ग्रँटरोड परिसरात राहणारी खुशी (20) ही घरी असताना तिला एकाचा कॉल आला. तुमच्या वडिलांकडून 12 हजार 5 00 रुपये उधारीने घेतले असून त्यांनी तुमच्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले आहे असे बोलून कॉलरने खुशी यांना टार्गेट केले. पुन्हा त्याने खुशीला कॉल करून माझ्याकडून चुकून जास्त पैसे गेल्याचे सांगितले. खुशीला हे खरे वाटल्याने तिने 32 हजार 500 रुपये परत कॉलरला पाठवले. आपली फसवणूक केल्याचे लक्षात येताच तिने डी. बी. मार्ग पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली. याप्रकरणी यूपीतल्या बिनोरारामपूर येथे जाऊन मोहित यादव (24) याला पकडून आणले.