माहीममध्ये स्लॅब कोसळून मजुराचा मृत्यू

बॉम्बे स्कॉटिश शाळेजवळील दिलीप गुप्ते मार्गावरील पाडकाम करण्यात येत असलेल्या एकमजली रिकाम्या इमारतीचा मोठा स्लॅब बुधवारी संध्याकाळी कोसळला. त्याच्या ढिगाऱयाखाली दोन मजूर महिला गाडल्या गेल्या. या घटनेनंतर स्थानिकांनी दोघींनाही ढिगाऱयाखालून बाहेर काढून हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, यातील एकीला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर चंद्रिका यादव (32) ही महिला जखमी झाली. मृत महिलेचे नाव समजू शकलेले नाही.