‘एक्स’वर अश्लील कंटेट अपलोडची परवानगी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ ने आपली पॉलिसी अपडेट केली आहे. त्यामुळे या प्लॅटफॉर्मवर ‘अॅडल्ट वा पॉर्न कंटेंट’ अपलोड करण्यास मंजुरी मिळाली आहे. एलन मस्क यांनी यापूर्वी दुसऱया सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नग्नतेला प्रोत्साहन देण्याचा ठपका ठेवला आहे. आता त्यांच्याच प्लॅटफॉर्मवर अॅडल्ट कंटेंट प्रमोट करण्यास परवानगी देण्यात आलेय. पॉर्न कंटेंट कुणाला दिसेल आणि कुणाला दिसणार नाही, याबाबत ‘एक्स’ने मार्गदर्शन सूचना जारी केल्या आहेत. या नव्या पॉलिसीमुळे हिंदुस्थानात ‘एक्स’वर बंदी येईल का, असा सवाल उपस्थित झाला आहे. कारण हिंदुस्थानात पॉर्न साईट्सवर बंदी आहे. ‘एक्स’ने अॅडल्ट कंटेंटसाठी काही मर्यादा आणि मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत.

…तर होईल कारवाई

जे युजर्स या मार्गदर्शक तत्त्वांचे, नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर ‘एक्स’ कारवाई करणार आहे. एखाद्या युजर्सने  अशा आशयाचा कंटेंट एक्सवर अपलोड करताना जर अॅडल्ट कंटेंट हे लेबल लावले नाही तर फिल्टरमध्ये असा कंटेंट आपोआप हटविण्यात येईल, पण जर त्याने याविषयीचे लेबल लावले असले तर त्यावर कारवाई होणार नाही. कुणालाही असा कंटेंट अपलोड करता येणार नाही.