याही वर्षी 3 टन केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थानला देणगी

साईभक्त रवि नारायण करगळ, चव्हाणवाडी ता शिरूर जिल्हा पुणे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी 3 टन केशर आंबे श्री साईबाबा संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याबाबतची माहिती श्री साईबाबा संस्‍थानचे मा. मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

साईबाबा यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे दान या ठिकाणी दिलेले आहे. कधी सोन्या चांदीच्या वस्तू तर कधी अशा मौल्यवान काही वस्तू या ठिकाणी साईबाबांना दान म्हणून केलेल्या आहेत कोट्यावधी रुपयांच्या या वस्तू दान रूपामध्ये देवस्थानला मिळत असतात तर आता काही भक्तांनी प्रसादासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य देण्यास सुरुवात केलेली आहे. गुरूवार दिनांक 06 जुन 2024 रोजी संस्‍थानच्‍या साई प्रसादालयात साईभक्‍तांच्या प्रसाद भोजनासाठी या आंब्‍यांच्‍या रसाचा समावेश करण्यात आला आहे.

यावर्षी आंबा हा प्रसादासाठी ठेवण्यात आला अनेकांनी आज या प्रसादाचा लाभ शिर्डी या ठिकाणी घेतला देवस्थानच्या वतीने मोठी अशी व्यवस्था या ठिकाणी भक्तांसाठी करण्यात आलेली होती सकाळपासूनच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली प्रशासनाच्या वतीने त्याचे योग्य पद्धतीने नियोजन सुद्धा करण्यात आलेले होते लाखो भक्तांनी याचा लाभ घेतला आहे