भाजपची नवनिर्वाचित खासदार व बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिच्या चंदिगढ एअरपोर्टवर एका महिला जवानाने कानाखाली मारल्याचे समोर आले आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून ती महिला जवान नाराज असल्याचे समजते. कुलविंदर कौर असे त्या महिला जवानाचे नाव आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीआयएसएफने समिती स्थापन केली आहे. ANI या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
#WATCH | BJP leader and actor Kangana Ranaut arrives at Delhi airport
A constable-rank CISF officer allegedly slapped Kangana at Chandigarh Airport during a frisking argument. An inquiry committee comprising senior CISF officers has been set up to conduct a further… pic.twitter.com/kUHmg7PsAs
— ANI (@ANI) June 6, 2024
भाजपची मंडीमधून निवडून आलेली नवनिर्वाचित खासदार कंगना रणौत हिने काही दिवसांपूर्वी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तिने शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटले होते. तिच्या या वक्तव्यावरून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्याचाच राग कुलविंदर कौर यांना होता.
कंगना आज दिल्लीत जाण्यासाठी चंदिगढ एअरपोर्टवर आली त्यावेळी तिथे तैनात असलेल्या कुलविंदर यांच्यासोबत तिचा वाद झाला. त्यानंतर कुलविंदर यांनी कंगनाच्या कानाखाली मारल्याचे समोर आले आहे.