टी20 वर्ल्डकपचा दहावा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान संघात पार पडला. बार्बाडोस येथे झालेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने ओमानवर 39 धावांनी विजय मिळवला. मार्कस स्टॉयनिस आणि डेव्हिड वॉर्नर यांनी अर्धशतकी खेळी केली, तर गोलंदाजीतही स्टॉयनिसने 3 बळी घेत विजयात मोठा वाटा उचलला.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना स्टॉयनिसच्या नाबाद 67 आणि वॉर्नरच्या 57 धावांचा बळावर 5 बाद 164 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ओमानचा संघ 20 ओव्हर मध्ये 9 बाद 125 धा मजल मारू शकला. ऑस्ट्रेलिया करून स्टॉयनिसने सर्वाधिक 3, स्टार्क, झंपा आणि एलिसने प्रत्येकी दोन बळी घेतले.