ED, CBI च्या भीतीने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांचे काय झाले? कोण जिंकले, कोणाला पराभूत व्हावे लागले? वाचा सविस्तर…

 

लोकसभा निवडणुकीचा अंतिम निकाल घोषित झाला आहे. NDA ला 293, तर INDIA आघाडीला 233 जागांवर विजय मिळाला. यंदाच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा ED, CBI च्या भीतीने पक्ष बदलणाऱ्या नेत्यांची झाली. निवडणुकीच्या तोंडावर अनेकांनी केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा चुकविण्यासाठी सत्ताधारी पक्षात धाव घेतली.

भाजपनेही भ्रष्टाचाराचे डाग लागलेल्या नेत्यांना आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून स्वच्छ केले. अशा नेत्यांना तिकीटही देण्यात आले. या नेत्यांचे निवडणुकीत काय झाले प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडणे साहजिक आहे. अशा बहुतांश नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्ष बदलणाऱ्या 13 नेत्यांपैकी 9 नेत्यांचा दारुण पराभव झाला. यात महाराष्ट्रातील यामिनी जाधव पासून पश्चिम बंगालमधील तपस रॉय यांचाही समावेश आहे.

पहाटे साडेतीन ही चौकशीची कुठली वेळ? सर्वोच्च न्यायालयाने ईडीला फटकारले

लोकसभा निवडणुकीच्या आधी 13 नेत्यांनी पक्ष बदलला. यातील 8 जणांनी भाजपात प्रवेश केला, तर काहींनी इतर पक्षाची कास धरली. यापैकी शिंदे गटाच्या यामिनी जाधव, भाजप प्रवेश केलेले तपस रॉय, ज्योती मिर्धा, कृपाशंकर सिंह, कोथापल्ली गीता, प्रणित कौर आणि गीता कोडा, प्रदीप यादव यांना पराभूत व्हावे लागले.