जगभरातून थोडक्यात बातम्या

अमेरिकेत हिंदुस्थानी विद्यार्थिनी बेपत्ता
अमेरिकेच्या पॅलिपहर्निया येथे आठवडाभरापासून 23 वर्षांची हिंदुस्थानी विद्यार्थिनी बेपत्ता आहे. तिला शोधण्यासाठी पोलिसांनी लोकांची मदत मागितली आहे. नितीशा पंडुला असे विद्यार्थिनीचे नाव असून ती पॅलिपहर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, सॅन बर्नाडिनो येथे शिकते. नितीशा 28 मेपासून बेपत्ता आहे.

अमृतसर सीमेवर दोन कोटी जप्त
सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) एका तस्कराच्या घरावर छापा टाकून दोन कोटी रुपये जप्त केले. पंजाब पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम हाती घेण्यात आली. अमृतसरच्या सीमेला लागून असलेल्या कक्कर गावात सीमापार अमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेल्या एका संशयित तस्कराच्या घरावर शोधमोहीम राबवण्यात आली.

उत्तर काशीत थंडीमुळे चार ट्रेकर्सचा मृत्यू
उत्तर काशीतील सहस्रताल ट्रेकिंगच्या मार्गावर गेलेल्या 22 जणांच्या ग्रुपपैकी चार जणांचा थंडीमुळे मृत्यू झाला आहे. आठ जण अजूनही अडकलेले आहेत. जमीन आणि हवाई मार्गाने त्यांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उर्वरित दहा ट्रेकर्सना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. 29 मे रोजी 22 सदस्यांची ट्रेकिंग टीम सहस्रताल ट्रेकवर गेली होती.

बंगळुरूमधील संतापजनक घटना; तरुणीच्या अंगावर रिक्षाचालक थुंकला
बंगळुरू येथील एका तरुणीला रस्त्याने जाताना अतिशय वाईट अनुभव आला. रिक्षाचालक गुटखा खाऊन अंगावर थुंकल्याचा आरोप तिने केला आहे. या घटनेचे काही पह्टो तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यात तिच्या कपडय़ावर थुंकल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. या तरुणीचे नाव परिशी असून ती
सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. बंगळुरूच्या इंदिरानगर भागातील रस्त्यावरून चालत असताना अचानक एक रिक्षाचालक तिच्या अंगावर गुटखा थुंकून निघून गेला. त्यामुळे तिचा पांढरा शर्ट खराब झाला.

एआय आता झूम मीटिंग अटेंड करणार
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयची जगभरात जोरदार चर्चा आहे. वेगवेगळय़ा क्षेत्रात एआयचे महत्व वाढले आहे. एआयमुळे अनेक कामे सोपी होत आहे. त्यामुळे भविष्यात ऑनलाईन मीटिंगमध्ये एआयसुद्धा उपस्थित राहू शकतात, असे विधान झूम पंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) एरिक युआन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात एआयची वाढ होईल. एआय झूम मीटिंगला उपस्थित राहील. या संकल्पनेला ‘एआय क्लोन’ असे नाव दिले आहे. ‘एआय क्लोन’ हे तुमच्या गैरहजेरीत तुमची उपस्थिती भरून काढेल. हे मॉडल व्यक्तीच्या डेटावर आणि कामाच्या पद्धतीवर आधारित असेल. त्यामुळे एआय क्लोन हे व्यक्तीसारखेच वागेल व निर्णय घेईल. ई-मेलला उत्तरेसुद्धा देईल, असे एरिक युआन यांनी सांगितले.

जाहिरातदारांना 18 जूनपासून द्यावे लागेल स्वयं-घोषणापत्र
सर्वोच्च न्यायालयाने जाहिरातदारांसाठी जारी केलेल्या निर्देशानुसार सर्व नवीन प्रिंट, डिजिटल, दूरदर्शन आणि रेडिओ जाहिरातींसाठी स्वयं-घोषणा सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार सरकारने जाहिरातदारांना 18 जूनपासून स्व-घोषणा प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले आहे. त्यातून जाहिरातींत दिशाभूल करणारे दावे नाहीत आणि नियामक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे, हे स्पष्ट करावे लागेल.
– टिव्ही आणि रेडियो जाहिरातींबद्दलचे स्वयंघोषणापत्र ब्रॉडकास्ट सेवा पोर्टलवर तसेच प्रिंट, डिजिटल, आणि इंटरनेट जाहिरातींसाठी प्रेस परिषदेच्या वेबसाईटवर अपलोड करावे लागेल. स्वयं-घोषणापत्रावर जाहिरातदार किंवा जाहिरात एजेन्सींच्या अधिकृत प्रतिनिधीचे हस्ताक्षर असले पाहिजे.
– जाहिरात पद्धती सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे पाऊल आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

अग्गोबाई…रशियन इन्फ्लुएन्सरला हवाय हिंदुस्थानी नवरा
रशियन इन्फ्लुएन्सर दिनारा हिला हिंदुस्थानी नवरा हवाय. त्यासाठी तिने
फॉलोअर्सना एक लाडिक विनंतीही केली आहे. व्हिडीओमध्ये दिनारा मॉलमध्ये लाल साडी नेसून आलेली आहे. तिच्या हातात इन्स्टाग्राम प्रोफाईलचा क्युआर कोड स्पॅनर आहे. ‘मी एका हिंदुस्थानी वराच्या शोधात आहे, असे ती म्हणतेय.

इम्रान खानची निर्दोष मुक्तता; दहा वर्षांची शिक्षा रद्द
पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने पुराव्याअभावी इम्रान खान आणि त्यांच्या सरकारमधील परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांची सिफर प्रकरणात (गुप्त पत्र चोरी) निर्दोष मुक्तता केली. गुप्त पत्र चोरी प्रकरणात इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी गेल्या वर्षी दोषी आढळले होते. देशाच्या गोपनीयतेचा भंग केल्याच्या आरोपावरून विशेष न्यायालयाने त्यांना दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला इम्रान खान आणि शाह महमूद कुरेशी यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सरन्यायाधीश आमिर फारुक आणि न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांनी इम्रान खान आणि कुरेशी यांच्या याचिकेवर निकाल दिला.

चीनची अंतराळ मोहीम यशस्वीतेकडे
चीनची महत्त्वाकांक्षी चेंज-6 अंतराळ मोहीम यशस्वी होण्याच्या दिशेने झेपावली आहे. चीनने या मोहिमेंतर्गत चेंज-6 यान चंद्राच्या मागील बाजूवरून जमीन आणि खडकांचे नमुने यशस्वीरीत्या गोळा केल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संशोधन प्रशासन (सीएनएसए) कडून एक व्हिडीओ प्रसारित करण्यात आला.