T20 World Cup 2024 : एअरटेलने जाहीर केला ग्राहकांसाठी विशेष प्लॅन

हिंदुस्थानातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादार भारती एअरटेलने (Airtel) जगातील सर्वात मोठी टी-20 क्रिकेट स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ग्राहकांसाठी खास पॅक चे अनावरण केले आहे. ग्राहकांना विनासंकोच कोणत्याही अढतळ्याविना सामने पाहता यावेत यासाठी एअरटेनले टी20 वर्ल्ड कपचा अधिकृत स्टीमिंग भागीदार डिस्ने+हॉटस्टारचा तीन महिन्यांचा सबस्क्रिप्शन प्लॅन लॉंच केला आहे.

एअरटेलने आपल्या प्रीपेड, पोस्टपेड, आंतरराष्ट्रीय रोमिंग, होम ब्रॉडबँड आणि एअरटेल डिजिटल टीव्ही वापरकर्त्यांसाठी ही सुविधेचा लाभ घेता येणार आहे. टी20 वर्ल्ड कपसाठी पुढील प्रमाणे प्लॅन लाँच करण्यात आले आहेत.

499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन असेल. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टारचे तीन महिन्यांचे सबस्क्रिप्शन आणि त्याचबरोबर 28 दिवसांसाठी दररोज 3GB हायस्पीड डेटा मिळेल. या प्लॅनमध्ये ग्राहकांना एअरटेल एक्स्ट्रिम प्लेवर 20 हून अधिक ओटीटी अॅप विनामुल्य सुरू करता येणार आहेत.

839 रुपयांचा 84 दिवसांचा प्लॅन देखील ऑफरमध्ये आहे. या ऑफरमध्ये दररोज 2 जीबी डेटासह समान फायदे मिळणार आहेत.

3359 रुपयांच्या वार्षिक प्लॅनमध्ये डिस्ने+ हॉटस्टारचे एक वर्षाचे सब्सक्रिप्शन, एक्सट्रीम अॅपवर ओटीटी प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस आणि दररोज 2.5 जीबी डेटा मिळेल.

पोस्टपेड प्लॅनमध्ये एक वर्षाचे डिस्ने + हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि एक्सस्ट्रीम अॅपवर 20 पेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रवेश, अमर्यादित 5 जी डेटा आणि कौटुंबिक अॅड-ऑन फायदे देखील मिळतात.

999 रुपये, 1498 रुपये आणि 3999 रुपयांच्या हाय स्पीड इंटरनेट, एंटरटेनमेंट, प्रोफेशनल आणि इन्फिनिटी प्लॅनच्या शोधात असलेल्या ग्राहकांना विविध स्पीड पर्याय देण्यात आले आहेत. याशिवाय प्लॅनमध्ये अमर्यादित डिस्ने+ हॉटस्टार सब्सक्रिप्शन आणि इतर फायद्यांचाही समावेश आहे.

लाइव्ह मॅच पाहण्यासाठी अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या चाहत्यांसाठी कंपनीने इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटीसह इंटरनॅशनल रोमिंग पॅक सुलभ केले आहेत. जेणेकरून चाहत्यांना सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल आणि दररोज 133 रुपयांमध्ये आंतरराष्ट्रीय रोमिंगचा आनंद घेता येईल, ज्यामुळे देशांतर्गत सिमच्या तुलनेतही परदेशात लाइव्ह पाहणे ग्राहकांना परवडेल.