लोकसभा निवडणुकीचा मंगळवारी निकाल लागला. BJP- NDA ला उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वात मोठा दणका बसला. यंदाच्या निवडणुकीत भाजपने देशात 400 पार आणि राज्यात 45 असा नारा दिला होता. मात्र जनतेने हातात घेतलेल्या निवडणुकीत भाजपला केंद्रात 300 आणि राज्यात 20 चा आकडाही पार करता आला नाही.
देशभरात NDA ला 293 जागा मिळाल्या तर राज्यात फक्त 17 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी हे पक्ष फोडून, तपास यंत्रणा मागे लावून आणि पंतप्रधान मोदींच्या 23 सभा होऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही.
राज्यात महायुतीला महाविकास आघाडीने धोबीपछाड दिला. या पराभवाचे खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडले जात आहे. मोदी आणि शहा यांनी निवडणुकीपूर्वी आणि प्रत्यक्ष निवडणूक सुरू झाल्यावरही महाराष्ट्राचे अनेक दौरे केले, सभा घेतल्या, रोड शो काढले. मात्र याचा भाजपला विशेष फायदा झाला नाही. उलट ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षात घेतल्याने आणि शिवसेना राष्ट्रवादी सारखे पक्ष फोडल्याने जनतेत रोष होता. हा रोष मतपेटीतून व्यक्त झाला.
निकल गयी सब हेकडी इनकी…प्रभूरामाने मोदी आणि भाजपला नाकारले! एनडीए काठावर… 291 जागा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात महायुतीच्या 23 उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. यापैकी 18 जागांवर महायुतीचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तर केवळ 5 उमेदवार विजयी झाले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने ‘मोदी की गॅरंटी’ला कचऱ्याची टोपली दाखवली आणि आपल मत महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले. महाविकास आघाडीने जवळपास 30 जागांवर विजय मिळवला.