दिल्लीतील मुलांच्या डोळ्यांच्या हॉस्पिटलला लागली भीषण आग

fire-delhi-children-hospital

दिल्लीतील मुलांच्या डोळ्यांच्या रुग्णालयात बुधवारी भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

ही घटना लाजपत नगर येथील आय 7 चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये घडली.

समोर आलेल्या व्हिडीओत इमारतीमधून धुराचे लोट बाहेर पडताना दिसतात.