लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर ‘इंडिया’ आघाडी व एनडीएला मिळालेल्या जागांमध्ये फार मोठा फरक दिसत नाही. त्यामुळे चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार या दोघांच्याही पक्षांना ‘इंडिया’ आघाडीमध्ये आणण्यासाठी निमंत्रण दिले जाऊ शकते. जर त्यांना निमंत्रण दिले तर एक मोठी आघाडी तयार होईल, असा ठाम विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांना बरोबर घ्यायला हवे. कारण नरेंद्र मोदी व अमित शहादेखील हाच प्रयत्न करतील. तेदेखील आमच्या घटक पक्षांपैकी कोणाला तरी फोडण्याचा प्रयत्न करतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली.