बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होती. त्यामुळे या नणंद भावजयच्या निकालाकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. अशातच आता सुप्रिया सुळे या विजयी आघाडीवर असून रोहित पवार यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी बच्चा बडा हो गया! असा जबरदस्त टोला अजित पवार यांना लगावला आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
🚩✌️#बच्चा बडा हो गया!
काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय!
बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार… pic.twitter.com/4WprsyPkHq
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 4, 2024
रोहित पवार यांनी शेअर केलेल्या ट्विटमध्ये म्हंटलेय की, ”#बच्चा बडा हो गया! काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय! बारामतीत सुप्रियाताईंचा #विजय ✌️हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, #महाविकासआघाडीचे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे.
या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!” ही पोस्ट शेअर केली आहे.