उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान झालं. यावेळी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष एकत्र निवडणूक लढले. तर भाजपनं छोट्या पक्षांसोबत युती केली होती. विशेष म्हणजे भाजपकडून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा प्रचारासाठी वापरण्यात आला होता. मात्र असे असताना देखील भाजपला गेल्या निवडणुकी इतकी चांगली कामगिरी करता आली नाही. इतकच काय तर प्रत्येक जागेवर आघाडी घेताना भाजपला घाम फुटल्याचं पाहायला मिळत आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत सपा-बसपा-आरएलडीची आघाडी होती आणि काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवली. मात्र, युती होऊनही सपा-बसपाला फारशा जागा जिंकता आल्या नाहीत. त्यांच्या आघाडीला केवळ 15 जागा मिळाल्या होत्या, तर एकट्या भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. तर अपना दल (एस)ला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळाली होती.
यंदा मात्र मतमोजणीचा कल पाहता संपूर्ण चित्र बदलल्याचं पाहायला मिळालं. समाजवादी पक्षानं 36 जागांवर आघाडी घेतली आहे, तर सोबत असलेल्या काँग्रेसनं देखील 8 जागांवर चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय लोकदल अवघ्या दोन जागांवर पुढे आहे.