Lok Sabha Election Results 2024 : सेक्स स्कँडल भोवलं; प्रज्ज्वल रेवण्णाचा दारूण पराभव

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून एनडीएच्या पराभवाचा पहिला निकाल कर्नाटकातून आला आहे. कर्नाटकच्या हसन मतदारसंघातून जेडीएस-एनडीएचे उमेदवार आणि सेक्स स्कँडलमधील आरोपी प्रज्ज्वल रेवण्णाचा दारूण पराभव झाला आहे. काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी रेवण्णा यांचा 44 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

हसन मतदारसंघावर गेल्या 25 वर्षापासून जेडीएसचे वर्चस्व होते. मात्र जेडीएसचा हा बालेकिल्ला काँग्रेसने ध्वस्त केला आणि मोठा विजय मिळवला. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मंड्या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर चामराजानगर मतदारसंघातून काँग्रेसचे सुनील बोस विजयी झाले.

Lok Sabha Election 2024 Result : ‘इंडिया’ आघाडीची मुसंडी; महाराष्ट्रासह यूपी, राजस्थान, हरयाणात भाजपची दाणादाण

मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीच्या कलांमध्ये प्रज्ज्वल रेवण्णाने 29 हजार मतांची आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर प्रत्येक फेरीनंतर काँग्रेसच्या श्रेयस पटेल यांनी ही आघाडी कापून काढली आणि नंतर आघाडी घेत विजय मिळवला. श्रेयस पटेल यांना जवळपास 6 लाखांहून अधिक मतं मिळाली, तर रेवण्णाला 5 लाख 60 हजार मतं मिळाली.

शेअर बाजारात भूकंप; निर्देशांक 6 हजार अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटींचे नुकसान