पालनाडू जिह्यातील मतदान पेंद्रावर ईव्हीएमची नासधूस करताना सीसीटीव्हीत रंगेहाथ पकडल्या गेलेल्या आंध्र प्रदेशच्या सत्ताधारी वायएसआर काँग्रेस आमदाराला उच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आज नाराजी व्यक्त केली. हा काही खेळ चाललाय का, असा संताप न्यायमूर्तींनी व्यक्त केला.
आमदार पिनेल्ली रामकृष्ण रेड्डी यांनी मतदान पेंद्रात घातलेल्या धुमाकुळाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. इतके होऊनही उच्च न्यायालयाने रेड्डी यांना बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत अटक करू नये असे आदेश देत अंतरिम संरक्षण दिले रेड्डी यांनी उद्या मतमोजणीच्या दिवशी या मतमोजणी पेंद्रात प्रवेश करू नये इतकेच नव्हे तर या पेंद्राच्या आसपासही फिरकू नये, असे मनाई निर्देश सुप्रीम कोर्टाने आज दिले.
काय केले होते रेड्डी यांनी
13 मे रोजी पालनाडू जिह्यातील एका मतदान पेंद्रात रेड्डी आणि त्यांचे समर्थक घुसले होते. तिथे त्यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी यंत्र टेबलवरून हिसकावून घेतले आणि जमिनीवर फेकले होते. मात्र काही दिवसांतच, रेड्डी यांना त्या आणि संबंधित प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती व्यंकट ज्योतिर्मयी यांच्या अंतरिम आदेशांमुळे अटकेपासून संरक्षण मिळाले. लोकसभा निकाल जाहीर झाल्यावर दुसऱया दिवशी बुधवारी सकाळी 10 वाजेपर्यंत आमदाराविरुद्ध कारवाई न करण्याचे निर्देश न्या. व्यंकट यांनी दिले आहेत.
ही तर न्यायव्यवस्थेची थट्टा
आज, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि संदीप मेहता यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवले. ही तर न्यायव्यवस्थेची संपूर्ण थट्टाच आहे, असे सांगत त्यांनी हे अंतरिम निर्देश रद्द करण्याचा विचार व्यक्त केला. जर आम्ही या आदेशाला स्थगिती दिली नाही, तर ती व्यवस्थेची थट्टा होईल…, असे या घटनेचा व्हिडिओ प्ले पाहिल्यावर न्या.. कुमार म्हणाले.