भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात मागील काही दिवसा पासून बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहेत. गोबरवाही परिसरातील अनेक भाविक प्रसिद्ध जागृत चांदपूर देवस्थानच्या दर्शनासाठी येत असतात. यावेळी दर्शनासाठी जात असताना गोबरवाही-चांदपूर मार्गावर चांदपूर खांदाड ते खैर टोला गावादरम्यान एक पट्टेदार वाघ रस्ता ओलांडताना नागरिकांना दिसला. त्यामुळे आता बिबट्या बरोबरच पट्टेदार वाघाचे पण दर्शन नागरिकांना होत असल्या मुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.