महाराष्ट्र कॅरम संघटनेच्या पहिल्या प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ

महाराष्ट्र कॅरम संघटनेने महाराष्ट्रातील कॅरम खेळाडूंसाठी पहिले वातानुकूलित प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची किमया केली आहे. या केंद्रात एपंदर आठ कॅरम बोर्ड मांडण्यात आले असून पेंद्र सराव व प्रशिक्षणासाठी खुले असेल.

महाराष्ट्रातील नोंदणीकृत खेळाडूंसाठी हे पेंद्र सुरू करण्यात आले असून राष्ट्रीय व अखिल हिंदुस्थानी स्तरावरील स्पर्धेपूर्वी  महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱया पुरुष व महिला गटातील खेळाडूंचे शिबीर याच पेंद्रात आयोजित केले जाणार आहे. विशेष करून ज्युनिअर गटातील मुल-मुलींना या प्रशिक्षण पेंद्रात खेळाच्या प्रशिक्षणासोबतच नियमांची माहिती दिली जाणार आहे.

या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. असोसिएशनच्या या स्तुत्य उपक्रमासाठी कॉम्रेड वेणू नायर यांनी रुपये एक लाख देणगी जाहीर केली. महाराष्ट्र पॅरम असोसिएशनच्या वतीने  मानद सचिव अरुण केदार यांनी नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सरचिटणीस कॉम्रेड वेणू नायर, युनियनचे सहाय्यक चिटणीस कॉम्रेड विनय सावंत तसेच इन्स्टिटय़ूटचे सचिव कॉम्रेड चेतन सावल यांचे कॅरम चे घडय़ाळ भेट देऊन स्वागत केले. तसेच प्रशिक्षण पेंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले. याप्रसंगी महाराष्ट्र पॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, खजिनदार अजित सावंत व मुंबई डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिशनचे कार्याध्यक्ष धनंजय पवार उपस्थित होते. शिवाय अनेक कॅरम खेळाडूंनी या कार्यक्रमास उपस्थित राहून आपला प्रतिसाद नोंदविला.