अनेकांना शॉपिंग करायला आवडतं. मात्र काही लोक शॉपिंगच्या अतिआहारी जातात. एक महिला चर्चेत आलेय, या महिलेला चक्क झोपेत शॉपिंग करायची सवय लागलेय. तिने म्हणे झोपेत तीन लाख रुपयांची शॉपिंग केली. 42 वर्षीय केली नाइप्स असे या महिलेचे नाव असून एक्सेसच्या बॅसिलडॉन येथे राहते. केली नाइप्सने जेव्हा 2006 साली पहिल्या मुलाला हेन्रीला जन्म दिला. तेव्हा तिला झोपेत चालण्याची सवय लागली, पण काही दिवसांत झोपेत चालण्याची सवय शॉपिंग सिकनेसमध्ये बदलली. झोपेत तिने बास्केटबॉल कोर्ट, पेंट, पुस्तके, मीठ, डब्या, मुलांची खेळणी, फ्रीज, टॅब्लेट, मिठाई अशा वस्तू ऑनलाइन खरेदी केल्या आहेत. क्रेडिट कार्डवरून तिने शॉपिंग केलेय.
अशी झाली फसवणूक
झोपेत केलेल्या शॉपिंगमुळे केली नाइप्सची एकदा मोठी फसवणूक झाली. तिला स्पॅम मॅसेज आला होता. त्यावर तिने बँक डिटेल्स भरली. तेव्हापासून तिची फसवणूक सुरू झाली. फसवणूक करणाऱयांनी तिचे बँक डिटेल्स विकले आहेत. त्यामुळे ती वारंवार फसवणुकीची शिकार होत असल्याचे तिला वाटते.