T20 World Cup 2024 : ‘हे’ नियम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा संपूर्ण बातमी

अवघ्या काही तासांवर टी20 वर्ल्ड कप येऊन ठेपला आहे. कोणता संघ जिंकणार, कोणता खेळाडू सर्वाधिक धावा करणार आणि कोणता खेळाडू सर्वाधिक विकेट घेणार. या सर्वांवर देशभरातली माजी खेळाडूंनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे. चाहत्यांमध्ये सुद्धा या सर्व घडामोडींवर चर्चा पार पडली. मात्र टी20 वर्ल्ड कपमध्ये लागू करण्यात आलेल्या नियमांवर चर्चा झालेली पाहायला मिळाली नाही. तेच नियम जाणून घेण्यासाठी बातमी संपूर्ण वाचा.

अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळाला प्रोत्सोहान देण्याच्या हेतूने ICC च्या माध्यामातून पहिल्यांदाच क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयूक्त आयोजनामध्ये 2 जून ते 29 जून या कालावधीत टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. स्पर्धा शिस्तबद्ध पार पाडावी यासाठी आयसीसीने नवीन नियमांची यादी जाहीर केली आहे. सामना टाय झाला किंवा सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली तर? पावसामुळे खेळात व्यत्यय आला तर? या सर्व प्रश्नांची उत्तरे नियमांमध्ये देण्यात आली आहेत. अमेरिकेमध्ये चालू सामन्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून आयसीसीने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

  • चालू सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला तर किमान 5 ओव्हरचा सामना खेळणे बंधनकारक राहिलं. पाऊस थांबलाच नाही तर दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. हा नियम साखळी फेरीतील आणि सुपर-8 मधील सामन्यांना लागू असेल.
  • पहिल्या उपांत्य फेरीतील सामन्याच्या दिवशी पाऊस आला तर 10 ओव्हरचा सामना खेळणे बंधनकारक असेल. पण पाऊस थांबलाच नाही किंवा अन्य काही कारणांमुळे सामना झाला नाही तर या सामन्यासाठी राखीव दिवस असेल.
  • दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. या सामन्यासाठी 250 मीनिटांचा वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे.
  • अंतिम सामन्यामध्ये पावसाचा व्यत्यय आला तर 10 षटकांचा सामना खेळणे बंधनकारक असेल. मात्र काही कारणास्तव त्या दिवशी सामना झाला नाही. तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता म्हणून घोषीत करण्यात येईल.

सामना टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येते. मात्र जर सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली तर? सुपर ओव्हर सुद्धा टाय झाली तर 1 तासांचा वेळ दोन्ही संघांना दिला जाईल. तरीसुद्धा निकाल लागला नाही तर, साखळी फेरितील आणि सुपर-8 मधील दोन्ही संघांना समान गुण दिले जातील. अशी परिस्थिती उंपात्य फेरीमध्ये निर्माण झाली तर सुपर-8 मधील गुणांच्या आधारावर संबंधित संघाला अंतिम फेरीचे तिकीट दिले जाईल.