अमृत महोत्सवी गोविंदराव मोहिते चषक आंतर रुग्णालय ‘ए’ डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद नानावटी रुग्णालयाने जिंकले. अंतिम फेरीत नानावटीने अंधेरीच्या बलाढय़ कोकिळाबेन धीरूभाई अंबानी-केडीए रुग्णालयाचा 25 धावांनी पराभव केला. आरएमएमएस व आयडियल स्पोर्ट्स अॅपॅडमी-ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये ओंकार जाधवने सर्वोत्तम अष्टपैलूचा, प्रथमेश महाडिकने उत्कृष्ट फलंदाजीचा तर मानस पाटील व प्रतीक पाताडेने उत्कृष्ट गोलंदाजीचा पुरस्कार पटकाविला. छत्रपती शिवाजी महाराज पाका&त झालेल्या सामन्यात नानावटीने ओंकार जाधवच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 षटकांत 6 बाद 154 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल केडीए रुग्णालय 20 षटकात 6 बाद 129 धावसंख्येपर्यंतच मजल मारू शकला आणि नानावटी रुग्णालयाने 25 धावांनी विजय संपादन करीत ‘ए’ डिव्हिजन अजिंक्यपदाला गवसणी घातली.