पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी आता पुणे पोलीस अल्पवयीन आरोपीची चौकशी करणार असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी बाल न्याय मंडळात या आरोपीची चौकशी करण्याची परवानगी मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. पुणे पोलिसांची ही याचिका मंडळाने मान्य करत आरोपीच्या चौकशीची परवानगी दिली आहे.
शुक्रवारी या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बिल्डर विशाल अगरवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री 3च्या सुमारास मित्रांसाबेत हॉटलेमध्ये मद्यपान पार्टी केल्यानंतर अलिशान पोर्शे कारने दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरूणीचा 10 ते 15 फूट उंच उडून खाली पडल्यामुळे जागीच मृत्यू झाला. तर, कारने फरफटत नेल्यामुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अल्पवयीन आरोपीला मारहाण करीत जाब विचारला.
या प्रकरणी विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल, प्रल्हाद भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे जयेश बोनकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. सुरेंद्र अग्रवाल हे आरोपीचे आजोबा असून चालकाला डांबून ठेऊन खोटा जबाब नोंदविण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.