हवामान केंद्रांच्या मापन यंत्रात बिघाड, नागपूरच्या तापमानात दाखवली मोठी वाढ

देशभरात सध्या उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. उत्तर हिंदुस्थानात आतापर्यंत उष्माघातामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरचे तापमान 56 अंश सेल्सियसपर्यंत पोहचल्याची बातमी सर्वत्र फिरू लागल्याने एकच खळबळ उडाली. मात्र काही वेळातच या बातमी मागचे सत्य समोर आले. नागपूरच्या सोनेगाव येथील हवामान केंद्राच्या मापन यंत्रात बिघाड झाल्याने चुकीच्या तापमानाची नोंद झाल्याचे हवामान केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हवामान विभागाने याबाबत एक पत्रक काढून स्पष्टिकरण दिले आहे.