Photo : पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिराच्या तळघरात काय-काय सापडले? बघा…

पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना मंदिराच्या हनुमान गेटजवळ फरशीचे काम सुरू होते. यावेळी जमिनीखाली तळघर आढळून आले. तळघराच्या पहिल्या खोलीत श्री विष्णू व श्री अष्टभुजा देवीची अत्यंत सुबक अशी मूर्ती आढळून आली आहे. त्या सोबत अन्य काही छोट्या मूर्ती पादुका आणि काही चलनी नाणी सापडली आहेत. या मूर्ती 17 व्या शतकातील असाव्यात, असा भारतीय पुरातत्व विभागाचा कयास आहे.

चार भुजा असलेल्या या मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, कमळ आहे. पाषाण दगडातील या मूर्ती अतिशय सुंदर आणि रेखीव आहेत. श्री आष्टभुजा देवीची मूर्ती अडीच फुटाची असून ही मूर्ती देखील रेखीव सुबक आहे.