सत्ताधाऱयांच्या भ्रष्टाचारामुळेच देशात सत्तांतर होणार – पृथ्वीराज चव्हाण

prithviraj-chavan

भ्रष्टाचारामुळे अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याने जनतेची लूट सुरू आहे. जनता सत्ताधाऱयांच्या भ्रष्टाचाराला वैतागल्याने देशात व राज्यात सत्तांतर होईल, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आज कोल्हापुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

चव्हाण म्हणाले, ‘पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणातील पोलिसांची वागणूक भयानक होती. राज्यात भ्रष्टाचारी सरकारमुळे अधिकारी पैसे देऊन हव्या त्या पदावर बसत असल्याचे यातून दिसून आले. जनता याला कंटाळली असून, लोकसभा निवडणुकीत देशात सत्तांतर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’

मोदींना उपचाराची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा समाचार घेताना चव्हाण म्हणाले, ‘मोदी सतत प्रचारात व्यस्त होते. यामुळे त्यांना काय