कापड व्यवसायासाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या सोलापूरची ओळख गिरणगाव म्हणून प्रसिद्ध होती. काळाच्या ओघात कापडाच्या गिरण्या व मिल बंद पडत गेल्या. सोलापुरातील प्रसिद्ध आणि बंद पडलेली लक्ष्मी-विष्णू मिलमधील सुमारे 50 मीटर उंचीची चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली. धोकादायक व एका बाजूने कललेली असल्याने ही चिमणी पाडण्यात आली. यापूर्वी सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी महापालिकेने पाडली.
सोलापुरातील हजारो कामगारांना रोजगार देणारे व लाखो लोकांचे कुटुंब पोसणाऱया कापड गिरण्या प्रसिद्ध होत्या. यातीलच लक्ष्मी-विष्णू मिल ही आंतरराष्ट्रीय मिल होती. ही मिल बंद पडल्यानंतर कामगार आणि सरकारी देणी देण्यासाठी मिलची जागा विकण्यात आली. सदरची जागा निवासी वापरासाठी अंतरिक्ष मल्टिकॉन प्रा. लि. कंपनीने विकत घेतली. या जागेतच 50 मीटर उंचीची दगडी व विटाने बांधण्यात आलेली मिलची अवाढव्य चिमणी होती. सदरची चिमणी अलीकडे एका बाजूने कलल्यामुळे धोकादायक बनली होती. विकत घेतलेल्या कंपनीने व महापालिकेने या चिमणीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पाडण्यास परवानगी दिली. मुंबईच्या एका कंपनीने पाडण्याचा ठेका घेतला होता. दुपारी बाराच्या सुमारास सदरची चिमणी जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी अग्निशमन दल, रुग्णवाहिका, पालिकेचे पथक आणि पोलीस