केरळमधील विद्यार्थी गिरविणार एआयचे धडे

केरळमधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (एआय) धडे दिले जाणार आहेत. येथील सर्व शाळांमध्ये येत्या जूनपासून  इयत्ता सातवीतील सुमारे 4 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात एआय विषयाचा समावेश केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना स्वतःचा एआय प्रोग्रॅम तयार करावा लागणार आहे. येथील माध्यमिक शाळांमधील 80 हजार शिक्षकांना एआयचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.