जगभरातील महत्वाच्या बातम्या

गुलाबी साडी गाण्याचे विदेशींनाही वेड

 

गुलाबी साडी या मराठमोळय़ा गाण्याने सोशल मीडियावर अनेकांना अक्षरशः वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक इन्स्टाग्रामवर रील्स बनवून धुमाकूळ घालत आहेत. फक्त सामान्य लोकच नाही, तर अनेक दिग्गज मराठी, बॉलीवूड कलाकार, तसेच परदेशातील अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रील्स तयार केल्या आहेत. सध्या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर किली रिकी पॉन्डने केलेल्या गुलाबी साडी या गाण्यावर केलेला डान्स अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.

विमानाच्या इंजिनात अडकून एकाचा मृत्यू

नेदरलँड्समध्ये केएलएम एअरलाईनच्या फ्लाईटच्या इंजिनमध्ये अडकल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. फ्लाईट केएल 1341 या विमानात ही दुर्दैवी घटना घडली. विमान अॅमस्टरडॅम विमानतळावरून डेन्मार्कला उड्डाण करण्याच्या तयारीत असताना या विमानाच्या इंजिनमध्ये अडकून या व्यक्तीचा मृत्यू झाला. विमान कंपनीने या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

रेखा झुनझुनवालांना 224 कोटींचा डिव्हिडेंड

राकेश झुनझुनवाला यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांना तब्बल 224 कोटी रुपयांचा डिव्हिडेंड मिळाला आहे. इकोनॉमिक टाईम्सच्या माहितीनुसार, झुनझुनवाला यांना टायटन कंपनीकडून सर्वाधिक 52.23 कोटी रुपयांचा डिव्हिडेंट मिळाला आहे, असे इकोनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनचे 4.74 कोटी शेअर्स आहेत.

उन्हाचा वाढता तडाखा फूड डिलिव्हरीसाठी मुले मिळेना

अनेक राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक फूड डिलीव्हरी, लॉजिस्टिक्स कंपन्यांना डिलीव्हरीसाठी मुले मिळेनासे झाली आहेत. वाढता उकाडा, कामगारांची गैरहजेरी आणि कमी उत्पादकता यामुळे डिलीव्हरी बॉय म्हणून काम करणाऱया मुलांची सध्या कमतरता जाणवत आहे. एका सर्व्हेनुसार महिन्याला 30 ते 40 टक्के चालक, वेअरहाऊस वर्कर्स, पिकर्स, पॅकर्स आणि लोडर्स नोकरी सोडत आहेत.

आवरा रे हिलामहिलेच्या डान्सवर नेटकरी भडकले

विमानतळावर एका महिलेचा डान्स व्हिडीओ व्हायरल झालाय. तो पाहून नेटकरी भडकले आहेत. विमानतळ प्रशासनाने महिलेवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी होत आहे. हा व्हिडीओ मुंबई विमानतळावरील असल्याचे समजते. महिला एअरपोर्टवर हिंदी गाण्यावर विचित्र पद्धतीने नाचताना दिसतेय. काही जण तिच्याकडे कुतूहल म्हणून बघताहेत, तर काहींना काय चाललेय तेच समजेना.