जम्मू-कश्मीरच्या कुपवाडामध्ये लष्कराच्या 16 अधिकारी आणि जवानांविरुद्ध हत्येचा प्रयत्न व दरोडा यासारखे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या अधिकाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले, त्यात तीन लेफ्टिनेंट कर्नल यांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री उशिरा कुपवाडा पोलीस स्टेशनमध्ये हल्ला केल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लष्कराच्या एका जवानाची पोलिसांनी चौकशी केली होती. या चौकशीवरून लष्कराच्या अधिकाऱयांनी पोलीस स्टेशनला येऊन धुडगूस घातल्याचा आरोप आहे. लष्कराच्या अधिकाऱयांनी पोलीस स्टेशनवर हल्ला केला, असा पोलिसांचा आरोप आहे. कथित ड्रग्ज प्रकरणातील आरोपात एका जवानाची चौकशी पोलिसांनी सुरू केली होती. याचा एक व्हिडीओ जारी करण्यात आला.