मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे मोटार चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाला वाचविण्यासाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. विविध पातळ्यांवर प्रयत्न करून आरोपी मुलगा निर्दोष असल्याचा प्रचंड पाठपुरावा केला. मात्र, प्रत्यक्षदर्शीनी सादर केलेल्या व्हिडीओंच्या आधारे पोलिसांनाही माघार घ्यावी लागली.
बांधकाम व्यावसायिकाचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवतच नव्हता. त्याच्याऐवजी दुसरा ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचा बनाव आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस ठाण्यात केल्याचे बोलले जात आहे. बांधकाम व्यावसायिकासोबत असलेले संबंध सुदृढ करण्यासाठी आमदार टिंगरे यांनी प्रयत्न केले. मात्र, प्रत्यक्षदर्शीसह नागरिकांनी काढलेल्या व्हिडीओंमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
Pune Porsche accident : मुलाच्या वडिलांना संभाजीनगरातून अटक, पब मालकही गजाआड
‘माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती मला रविवारी पहाटे कार्यकर्त्यांनी कळवली. माझे परिचित विशाल अगरवाल यांनीही फोन करून त्यांच्या मुलाचा अॅक्सिडेंट झाल्याचे सांगितले. त्यानुसार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे घटनास्थळ आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो. पोलीस निरीक्षकांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दोषींवर कठोर कारवाई करण्याची सूचना देऊन मी निघून आलो. मी कोणताही दबाव आणला नाही,’ असा दावा आमदार सुनील टिंगरे यांनी केला आहे.
बिल्डर पुत्राला पोलीस ठाण्यात बसायला खुर्ची, खायला पिझ्झा-बर्गर
आरोपीला वाचवण्यासाठी खटाटोप
पुण्यात ‘मोक्का’तील गुन्ह्यात अडकलेल्या एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाला पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना सांगून सोडवले होते. याची कबुली पवारांनी थेट एका सभेत दिली होती. त्यामुळे एकीकडे अजित पवार यांनी ठरविले की गुन्ह्यातील आरोपीची सुटका होते, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांनी अल्पवयीन आरोपीला गुन्ह्यातून वाचविण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात पहाटेपर्यंत केलेले प्रयत्न एकसारखे असल्याचे बोलले जात आहे.