लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान शुक्रवारी सुरू झालं. दरम्यान, समाजवादी पार्टीने निवडणूक प्रक्रियेतील गडबडीवरून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदान केंद्रावर भाजप उमेदवाराची बायको असून ती भाजपला मतदान करावं यासाठी दबाव आणत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी मुस्लीम मतदारांच्या मतदानात जाणूनबुजून तांत्रिक अडथळे निर्माण केले जात आहेत, असंही या तक्रारीत म्हटलं आहे.
आपल्या अधिकृत एक्स पोस्ट हँडलवरून ही तक्रार करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 8 जागांवर मतदान पार पडत आहे. यात मथुरा, गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, बागपत, मेरठ, अमरोहा, बुलंदशहर आणि अलिगढ यांचा समावेश आहे. सपाने या प्रत्येक जागांवरील बूथ संख्या ते ईव्हीएममधील तांत्रिक चुकांविषयी तक्रार केली आहे.
गौतम बुद्ध नगर लोकसभा के सेक्टर 56 में बूथ संख्या 113 – 120 पर भाजपा प्रत्याशी की पत्नी अपनी पार्टी का पट्टा पहनकर कर रहीं प्रचार, मतदाताओं पर बना रहीं दबाव।
संज्ञान ले चुनाव आयोग, निष्पक्ष मतदान सुनिश्चित हो।@ecisveep @ceoup @dmgbnagar
— Samajwadi Party (@samajwadiparty) April 26, 2024
सपाने केलेल्या तक्रारीनुसार, गौतम बुद्धनगर मधील सेक्टर 56मध्ये बूथ क्रमांक 113-120 वर भाजप उमेदवाराची पत्नी आपल्या पक्षाचा पट्टा लावून प्रचार करतेय, अशी तक्रार करण्यात आली आहे. अशा प्रकारे आचारसंहिता लागू असताना प्रचार करणं चूक आहे, त्यामुळे मतदारांवर प्रभाव पडतो असं सपाचं म्हणणं आहे. तसंच, बागपतच्या मुस्लीमबहुल असलेल्या मोदीनगर येथे मतदान केंद्र क्रमांक 258 वर मतदारांना मत देण्यापासून रोखण्यात येत आहे. तसंच, गाझियाबाद इथल्या 282 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन बिघडल्याची तक्रारही सपाने केंद्रीय निवडणूक आयोगाला केली आहे. त्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक आयुक्त तसंच, संबंधित जिल्ह्यांच्या दंडाधिकाऱ्यांनाही टॅग करण्यात आलं आहे.
बागपत लोकसभा के मोदीनगर में बूथ संख्या 258, जो कि मुस्लिम बाहुल्य है, इसपर मतदाताओं को वोट डालने से रोक रहा प्रशासन।
संज्ञान ले चुनाव आयोग, निष्पक्ष मतदान सुनिश्चित हो।@ecisveep @ceoup @BagpatDm
— Samajwadi Party (@samajwadiparty) April 26, 2024