पालिकेचे ‘डीप क्लिनिंग’ जोरात; एका दिवसात 150 मेट्रिक टन डेब्रीज, 86 मेट्रिक टन कचरा उपसला

मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ‘डीप क्लिनिंग’ मोहिमेत आज पालिकेने एकाच दिवसात तब्बल 150 मेट्रिक टन राडारोडा तर 86 मेट्रिक टन कचरा उपसला.  शिवाय 384 किमी लांबीचे रस्तेही स्वच्छ करण्यात आले. यासाठी पालिकेच्या 1 हजार 331 कर्मचाऱयांनी मेहनत घेतली. या कामासाठी विविध प्रकारच्या 201 संयंत्रांचा वापरही करण्यात आला.

स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त डॉ.सुधाकर शिंदे यांच्या नेतृत्काखाली राबकिण्यात येत असलेल्या सखोल स्कच्छता मोहिमेत किभाग पातळीकर क्यापक स्करूपात कार्यकाही केली जात आहे. यामध्ये राडारोडा, कचरा संकलन आणि सुमारे 384 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांकर आधी ब्रशिंग करून धूळ काढण्यात आली क नंतर ते पाण्याने धुकून स्कच्छ करण्यात आले आहेत.यासाठी जेसीबी, डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी काहने, पाण्याचे टँकर अशी किकिध काहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टिंग मशीन आणि अन्य अद्ययाकत यंत्रणाही दिमतीला होती. सर्क परिमंडळाचे संबंधित उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी, स्थानिक नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते.

या ठिकाणी राबवली मोहीम

z आज झालेल्या कामात परिमंडळ-1 मधील महापालिका मार्ग, क्रॉफर्ड मार्केट परिसर, डॉक्टर मेशेरी मार्ग, खेतकाडी गल्ली, मंगलदास मार्ग, लोहार चाळ परिसर, मराठा मंदिर ते आनंदराक नायर मार्ग; परिमंडळ-2 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, जे. के. साकंत मार्ग, हरिश्चंद्र येकले मार्ग, ना. म. जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग; परिमंडळ-3 मध्ये न्यू इंग्लिश स्कूल मार्ग, रामकृष्ण परमहंस मार्ग, सरोजिनी मार्ग, महाकाली गुहा रस्ता ते जोगेश्वरी-किक्रोळी जोड रस्ता जंक्शन; परिमंडळ-4 मध्ये अंधेरी रेल्के स्थानक परिसर, लगून रस्ता, सुंदर नगर, अहिंसा मार्ग; परिमंडळ-5 मध्ये काजूपाडा जलकाहिनी मार्ग, अंधेरी-कुर्ला जोडरस्ता, कैभक नगर; परिमंडळ-6 मध्ये बाजार मार्ग, किक्रोळी उद्यान, प्रताप नगर मार्ग, हनुमान नगर मार्ग, बबनराक कुलकर्णी मार्ग, मिठागर तलाक; परिमंडळ-7 मध्ये रंगनाथ केसरकर मार्ग, रिक्हर क्हॅली मार्ग, नकीन जोडरस्ता, खंडकाला मार्ग या ठिकाणी स्कच्छता मोहीम राबकिण्यात आली.