कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. आत्ताचे महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे खरे वारसदार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य करत संजय मंडलिक यांनी मुक्ताफळं उधळली आहेत. यावरून आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. छत्रपतींच्या गादीचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात संतापाची लाट; मिंधेंच्या नकली सेनेकडून छत्रपतींच्या गादीचा घोर अपमान
‘छत्रपती शाहू महाराज हे वारसदार नाहीत, मग संजय मंडलिक वारसदार आहेत का? यांचे वडील सदाशिवराव मंडलिक हे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते. शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापुरातील राजकारणात काम करत होते. कोल्हापूरची शाहू महाराजांची गादी ही शिवाजी महाराजांची गादी आहे. त्या गादी विषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे. या निवडणुकीत तुमच्या पायाखालची वाळू सरकतेय, हे समजल्यावर तुम्ही महाराष्ट्राच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करत आहात, हे लक्षण चांगलं नाही. शाहू महाराजांनी महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जी भूमिका घेतली आहे, त्या आधीपासून ते सामाजिक कार्यात आहेत. कोल्हापूरच्या विकासासाठी काम करत आहेत. अशावेळेला राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत, मंडलिक त्यांनी जी भाषा वापरली हे महाराष्ट्र सहन करणार नाही’, असं संजय राऊत म्हणाले.
Lok Sabha Election 2024 : भाजपची दहावी यादी जाहीर, उदयनराजे भोसले वेटिंगवरच
‘कोल्हापूर, हातकणंगले आणि कोकणात भाजप आणि मिंधे गटाच्या उमेदवारांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी जे धमकी सत्र सुरू केलं आहे किंवा जे अमिष दाखवलं जात आहे, त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला हवी. तुम्ही अमिष दाखवता. पाच-पाच कोटीचा निधी दिला जाईल, म्हणतात. तुम्ही सरपंचाना धमक्या देताय. एका बाजूला विरोधकांवर आचारसंहिता अत्यंत कडक आणि कठोरपणे लावता. त्याचवेळेला सत्ताधारी पक्षाचे लोक सरपंचाना धमक्या देत आहेत. मतदारांना अमिष दाखवत आहेत. हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. निवडणुका योग्य पद्धतीने होत नाहीत याचे हे चित्र आहे’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.