दिल्लीतील ‘आप’च्या मंत्र्याचा राजीनामा, अलीकडेच ED ने टाकला होता छापा

दिल्ली सरकारमधील मंत्री राजकुमार आनंद यांनी पदाचा राजीनामा दिली आहे. राजकुमार आनंद दिल्ली सरकारमध्ये समाजकल्याण मंत्री होते. अलीकडेच राजकुमार आनंद यांच्या घरी ED ची धाड पडली होती. आता त्यांनी आम आदमी पार्टी आणि मंत्रीपद असा दोघांचाही राजीनामा दिला आहे. 2020 मध्ये राजकुमार आनंद हे आम आदमी पार्टीच्या तिकीटावर पटेलनगर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

राजीनाम्यानंतर दिली प्रतिक्रिया…

‘दिल्ली सरकारमध्ये मी मंत्री आहे. माझ्याकडे सात खाती आहेत. पण आज मी व्यथित आहे आणि आपले दुःख व्यक्त करतोय. राजकारण बदलले तर देश बदलेल असे, केजरीवाल म्हणाले होते. त्यानंतर मी राजकारणात आलो. राजकारण बदललं नाही पण नेते बदलले’, असे राजकुमार आनंद म्हणाले.

मोदी सरकारला तिहार जेलचे गॅस चेंबर करायचे आहे काय? संजय सिंह यांचा संतप्त सवाल

‘आम आदमी पार्टीचा जन्म हा भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनातून झाला होता. पण आज ही पार्टी भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसली आहे. यामुळे मंत्रीपदावर राहून काम करणं मला अशक्य झालं. म्हणून पार्टी, सरकार आणि मंत्रीपदाचा राजीनामा देतोय. कारण भ्रष्टाचारात माझे नाव येऊ द्यायचे नाही’, असे ते पुढे म्हणाले.

केजरीवाल यांची अटक योग्यच! दिल्ली उच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला

राजीनाम्याच्या एक आठवड्यापूर्वी राजकुमार आनंद यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनात एक पोस्ट शेअर केली होती. ‘निवडून आलेले मुख्यमंत्री आणि एका खासदाराला भेटीसाठी टोकन नंबर दिला जातो. त्यानंतर त्यांची भेट रद्द केली जाते. तिहार तुरुंगातील अधिकारीही मोदी सरकारच्या दबावात आहेत’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.