तेलंगणा सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी जोरदार चकमक उडाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. छत्तीसगडचे विजापूर पोलीस आणि ग्रेहाऊंड टीमने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. या काळात जवानांनी एके-47, एलएमजीसारखी शस्त्रsही जप्त केली आहेत. विजापूर जिह्यातील पुजारी कांकेर येथील करीगुटा जंगलात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर छत्तीसगड पोलीस आणि तेलंगणाच्या ग्रेहाऊंड पर्ह्सने तरुण माओवाद्यांना घेरण्यासाठी संयुक्त कारवाई सुरू केली. ज्यामध्ये 3 नक्षलवादी ठार झाले. तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. घटनास्थळी फौजफाटा उपस्थित आहे.