>> हर्षवर्धन दातार
वाल्ट्झ या अत्यंत आकर्षक नृत्य-संगीत प्रकाराने सगळ्या चित्रसृष्टीला भुरळ पाडली आणि त्यातून निर्माण झाली असंख्य लोकप्रिय गाणी. एक हात हातात तर एक खांद्यावर अशा जवळीक साधण्याच्या या युगल नृत्य प्रकारामुळे सुरुवातीला विरोध आणि पुढे त्याच कारणामुळे लोकप्रिय झालेला अनोखा वाल्ट्झ!
नृत्य आणि संगीत हे नेहमीच एकत्र, हातात हात घालून (किंवा पावलावर पाऊल ठेवून) मार्पामण करीत आले आहेत. जगात आणि आपल्याकडेसुद्धा शास्त्राrय आणि इतर नृत्य प्रकारांबरोबर गाण्याचीही साथ असते. ’मुड मुड के ना देख’ या ’श्री 420’ (1955) चित्रपटातील गाण्यात आपण पडद्यावर राज कपूर, नादिरा आणि सहकारी लयबद्ध तालात नृत्य करताना बघतो. मात्र लगेच पुढील कडव्यात याची चाल आणि लय द्रुतगतीने वाढते. सुरुवातीला आपण जे बघतो तो प्रसिद्ध ’वाल्ट्झ’ नृत्य प्रकार किंवा लय आहे. हिंदी चित्रपटात वाल्ट्झ तालावर आधारित इतकी असंख्य गाणी आहेत की, त्यावर अनेक लेखसुद्धा कमी पडतील. ही एक अशी लय आहे की, ऐकणारा आपोपाप त्या लयीवर तरंगायला लागतो.
पाश्चिमात्य आणि हिंदुस्थानी संगीताचा सुरेख मिलाफ ए. आर. रेहमाननी वाल्ट्झच्या माध्यमातून ‘लगान’मधील (2001) ‘ओरी छोरी’ या नृत्यप्रधान गाण्यात आणला आहे. गाण्यानंतर इंग्रजांच्या महालात पुरुष व स्त्रिया नृत्य करताना दिसतात तेव्हा व्हायोलिनवर तीन बीट्स वाजत राहतात. तसेच आर. डी. बर्मननी इंग्रजांविरुद्धच्या लढय़ावर आधारित ‘1942- ए लव्ह स्टोरी’ (1994) या आपल्या शेवटच्या चित्रपटात ‘कुछ ना कहो’ या गाण्यात वाल्ट्झ लय अतिशय उत्कृष्टपणे वापरली आहे. 3 x 4 अर्थात 12 मात्रांचा वाल्ट्झ रिदम हा युगल नृत्याचा रोमँटिक प्रकार आहे, जो बॉक्स स्टेप्स म्हणजे चौरसाच्या आकारात केला जातो. हा रिदम सोळाव्या शतकात जर्मनीमध्ये सुरू झाला आणि पुढे जगभर लोकप्रिय झाला. वाल्ट्झचा मूळ लॅटिन शब्द आहे ‘वोलवेरे’ अर्थात वर्तुळाकार नृत्य प्रकार. वाल्ट्झ म्हटलं की, लगेच ‘प्यासा’तलं (1957) गुरुदत्त आणि माला सिन्हा जोडीचं स्वप्नगीत ‘हम आप की आँखो मे’ डोळ्यांसमोर येतं. मात्र हा वाल्ट्झ प्रकार नाही. कारण हे नृत्य 2 x 4 मात्रांच्या तालावर बसवलेलं आहे. ‘रात और दिन’ (1967) फिरोझ खान आणि नर्गिसवर चित्रित ‘दिल कि गिरह खोल दो’ वाल्ट्झ लयीवरचं उत्तम उदाहरण आहे. यात नर्गिस आणि फिरोझ खान आधुनिक पाश्चात्त्य संस्कृतीचे दर्शन घडवितात. गाणं गिटारच्या तालावर सुरू होऊन पुढे त्यात तबल्याचा ठेका येतो. अकार्डियन, व्हायोलिनबरोबर लता-मन्ना डे जोडीची गायकी. संगीतकार अनिल बिस्वास यांच्या ‘अलीबाबा’मधील (1940) ’हम और तुम और ये ख़ुशी’ हे बहुधा वाल्ट्झ तालावरचं पहिलं गाणं असावं. याच गाण्याशी मिळतेजुळते ’हम और तुम और ये समा’ शब्द आणि आशय असलेल ’दिल दे के देखो’ (1959) चित्रपटातील गाण्यात उषा खन्नांनी वाल्ट्झ रिदम वापरला. नौशादही मागे राहिले नाहीत. ‘अंदाज’मधलं
(1949) ’तोड दिया दिल मेरा’ तसेच ‘जादू’मध्ये (1951) ’अब रात मीलन की’ आणि ‘दास्तान’मधलं (1952) ‘तारा री तारा री’ ही त्यांनी वाल्ट्झवर बसवलेली काही गाणी. ‘हाऊस नंबर 44’मध्ये (1955) सचिन देव बर्मननी देव आनंद आणि कल्पना कार्तिककरिता ’फैली हुई है सपनो की बाहें’ या शब्दांशी जुळून येणारा वाल्ट्झचा ठेका वापरला. या गाण्यात नायिका कल्पना कार्तिक जणू बागेतील झाडांबरोबर वाल्ट्झ नृत्य करत असताना दिसते. याच चित्रपटात वाल्ट्झ तालावर ‘चूप है धरती चूप है चांद सितारे’ देव आनंद आपल्याच विचारात गुंतला आहे आणि बागेत बसून हे गाणे म्हणतो. आवाज हेमंत कुमारचा. नवकेतनच्या ’प्रेम पुजारी’मध्ये (1969) अंतऱयापासून सुरू होणारं ‘फुलों के रंग से’ हे युरोपियन रेल्वे प्रवासातील किशोर कुमारांनी गायलेलं कवी नीरज यांचं लाजवाब गाणं. यात वाल्ट्झ ताल असूनसुद्धा चालीला एक वाहता प्रवाह आहे.
आर. डी. बर्मन – वाल्ट्झ ताल आणि अकार्डियनची सुरावट यांचं एक जवळचं नातं आहे. बऱयाच गाण्यांत जिथे अकार्डियनची सुरावट आहे, ती गाणी वाल्ट्झ ठेक्यावर आहेत. त्याचप्रमाणे पियानो आणि वाल्ट्झ यांचेसुद्धा अतूट नाते आहे. ’बडे दिलवाला’ चित्रपटात ’जीवन के दिन छोटे सही’ गाण्यात ऋषी कपूर पियानो वाजवतो आणि टीना मुनीमबरोबर वाल्ट्झ नृत्यही करतो.
साहिर-पंचम यांनी फक्त चार चित्रपटांत काम केलं. त्यातील एक ’आ गले लग जा’ यात स्केटिंगला वाल्ट्झची उपयुक्त साथ देणारं प्रेम (शशी कपूर), प्रीती (शर्मिला टागोर) आणि राहुल (मास्टर टिटो)… त्यांचा अपंग मुलगा यांच्यातील नात्याचं वर्णन करणारं ’तेरा मुझसे है पहले का नाता कोई’ गाणं किशोर कुमार तसेच सुषमा श्रेष्ठ या दोघांनी वेगवेगळं गायलं आहे (taह्सा् नेग्दह). ‘सेव्हन ब्राईड्स फॉर सेव्हन ब्रदर्स’वर आधारित धमाल ’सत्ते पे सत्ता’ (1982) चित्रपटात रवी (अमिताभ बच्चन) ’दिलबर मेरे कब तक मुझे’ या वाल्ट्झ पार्टी नृत्य-गीतातून इंदूला (हेमा मालिनी) पटविण्याचा प्रयत्न करतो.
संगीतकार ओंकार प्रसाद नय्यर यांच्या चालीवर पियानो वाजवून सुरुवात करणारा किशोर कुमार आणि मीना कुमारी यांनी ‘नया अंदाज’ (1956) चित्रपटात आपल्या प्रेमाची कैफियत ’मेरे निंदो मे तुम, मेरे ख्वाबो मे तुम’ या गाण्यातून व्यक्त केली आहे. मीना कुमारीला आवाज दिला आहे शमशाद बेगमनी. ‘सीआयडी’मध्ये (1956) याच वाल्ट्झ ठेक्यावर रफींनी जॉनी वॉकरकडून ’ऐ दिल है मुश्कील जिना यहाँ’ गाण्यातून मुंबई नगरीचं वैशिष्टय़ नमूद केलं आहे. ‘ऐ दिल है मुश्कील जीना यहाँ’पासून सुरुवात करून ‘ऐ दिल है आसां जीना यहाँ’ पर्यंतचा प्रवास करत मुंबई मायानगरीचं चपखल वर्णन या वाल्ट्झ गाण्यात दिसतं. याच ओ. पी. नय्यरनी चित्रपटसृष्टीतली आपली जागा पक्की केली गुरुदत्तच्या ’मिस्टर आण्ड मिसेस 55’ या संगीतप्रधान चित्रपटातून. यात ’उधर तुम हसीन’ हे रफी-गीता दत्तचे वाल्ट्झ आधारित श्रवणीय गाणे आहे.
वाल्ट्झ ऐकताना आणि बघताना आपणही आपसूकपणे त्यावर ताल धरतो. अशा या अत्यंत आकर्षक नृत्य-संगीत प्रकाराने चित्रसृष्टीला भुरळ पाडली आणि त्यातून असंख्य लोकप्रिय गाणी निर्माण झाली. अशाच काही गाण्यांची सैर करूया पुढच्या भागात.
[email protected]
(लेखक संगीत अभ्यासक आहेत.)