काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंच्या गाडीवर हल्ला, भाजप कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप

काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर पंढऱपूरजवळ हल्ला झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे गावोगावी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेते आहेत. गुरुवारी दिवसभर त्यांनी पंढरपूर तालुक्यातील विविध गावांना भेटी दिल्या. मात्र सरकोली गावाजवळ त्यांचा ताफा अडवण्यात आला आणि गाडीची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाला. मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्या आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच प्रणिती शिंदे मतदारसंघात सक्रिय आहेत. गुरुवारी त्यांनी पंढरपूर तालुक्यातील काही गावांना भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. रात्री त्यांचा ताफा सरकोली येथे पोहोचला असता त्यांच्या गाडीवर हल्ल्याच्या प्रयत्न झाला. यावेळी प्रणिती शिंदे संतापातच गाडीतून बाहेर आल्या आणि गाडीला हात लावायचा नाही असा दम भरला.

या घटनेनंतर सोलापुरात आल्यावर प्रणिती शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत भाजपवर घणाघाती आरोप केला. मराठा आंदोलनाला माझे समर्थन आहे. मात्र भाजपची लोकं मराठा आंदोलनाच्या आडून हल्ला करत आहेत. त्यांनी माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला केला, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे दिसताच मी गाडीतून उतरले आणि माझ्या गाडीला हात लावू नका असे ओरडले. मात्र ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. हे आंदोलक नव्हते तर भाजपची लोकं होती, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

भाजप मराठा आंदोलनाच्या आडून महिला आमदांवर हल्ला करत आहे याची मनोज जरांगे-पाटील यांनीही याची नोंद घ्यावी. जरांगे पाटलांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)