राज्यातील मिंधे सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना अडचणीत आणण्याचे कारस्थान रचले आहे. त्यामुळे सभेत प्रक्षोभक भाषण व वेळेचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यात जरांगेंसह त्यांच्या 29 सहकार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई तब्बल दोन दिवसांत करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे दुसर्या टप्प्यातील आंदोलन सुऊश् आहे. त्याअंतर्गत त्यांनी 13 मार्च रोजी बीडमधील अंबाजोगाई येथे मराठा समाजाची संवाद बैठक झाली. त्यावेळी मनोज जरांगे यांनी रात्री 10 वाजता ध्वनीक्षेपकावरून प्रक्षोभक भाषण केल्याच्या कारणावरून पोलीस कर्मचारी संतोष बदने यांच्या फिर्यादीवरून मनोज जरांगे, बैठकीचे आयोजक सचिन जोगदंड पाटील, राजेसाहेब देशमुख, अॅड. माधव जाधव, अमर देशमुख, अजित गरड, रणजित लोमटे, अमोल लोमटे, राहुल मोरे, अॅड. जयसिंग सोळंके, अॅड. किशोर देशमुख, भीमसेन लोमटे आणि साधना मंगल कार्यालयाचे मालक रवीकिरण मोरे यांच्यासह 13 जणांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तांदळवाडी घाट येथील हरिनाम सप्ताहास मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. या भेटीत वेळेचे पालन केले नाही म्हणून पोलीस कर्मचार्याच्या तक्रारीवरून मनोज जरांगे यांच्यासह स्वप्निल गलधर, गंगाधर काळकुटे, अॅड. बळवंत कदम, हनुमान मुळीक, नीलेश भटे, महादेव खोसे, बळीराम सिरसट, नामदेव घोडके, जगन्नाथ घोडके, अनिल खोसे, लक्ष्मण भागड, ईश्वर सिरसट, चक्रधर खोसे, सखाराम खाडे आदी 16 जणांवर नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. एकाच जिल्ह्यात सलग दोन ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आल्यामुळे मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे.
जरांगेंच्या सभांवर पोलीस नजर ठेवून मनोज जरांगे पाटील यांच्या बैठका आणि सभा रात्री उशिरा होत असतात. मात्र, आता या सभांवर पोलीस नजर ठेवून आहेत. ज्या-ज्या ठिकाणी अशा बैठका झाल्यात अथवा सभा झाल्यात, त्या ठिकाणी गुन्हे नोंद करण्याचे काम पोलिसांकडून सुरु आहे. मागील दोन दिवसात बीड जिल्ह्यातील माजलगाव ग्रामीण, तसेच अंबाजोगाई शहर, नेकनूर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत तब्बल पाच गुन्हे मनोज जरांगे पाटील यांच्या विरुद्ध दाखल झाले आहेत.
अशोक चव्हाण जरांगेंच्या भेटीला…
बीड जिल्ह्याचा दौरा केल्यावर शनिवारी मनोज जरांगे आंतरवाली सराटीत दाखल झाले. दरम्यान, शनिवारी रात्री भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. रात्री साडेअकरा वाजता सुरू झालेली बैठक मध्यरात्री दीड वाजता संपली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली. तर, पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात मराठा तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचं म्हणत जरांगे यांनी सरकारविरोधात आपली नाराजी बोलून दाखवली.