मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमले

मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी छेडलेल्या आंदोलनाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास तथक (SIT) नेमण्यात आली आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे या तपास पथकाचे नेतृत्व करणार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशानंतर हे पथक नेमण्यात आले आहे.

महाराष्ट्र बेचिराख होईल अशा जरांगे यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात काहीतरी भयंकर घडण्यासाठी कट रचला जातोय अशी परिस्थिती असल्याने या आंदोलनाची एसआयटी चौकशी केली जावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने विधानसभेत केली होती