ईव्हीएम हॅकिंगचा हा घ्या पुरावा, वंचित आघाडीने माध्यमांसमोर केले सादरीकरण

अब की बार 400 पार अशी घोषणा देणाऱया पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचा संपूर्ण भरोसा ईव्हीएम मशिनवर आहे. ईव्हीएम शिवाय भाजपला हे शक्यच नाही असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ईव्हीएम मशीन कशा प्रकारे हॅक होऊ शकते याचे स्क्रीनच्या सहाय्याने आज सादरीकरण केले.

प्रकाश आंबेडकर यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यात ईव्हीएम मशीन्स कशी हॅक होऊ शकते, याचे सादरीकरण केले. त्यानंतर आंबेडकर म्हणाले, मतदानानंतर व्हीव्हीपॅटची पावती मतदारांना मिळायला हवी. मतदारांनी या पावतीची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर ती बॅलेट बॉक्समध्ये टाकावी, अशी मागणी आम्ही आयोगाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणुकीत उमेदवार वाढल्यास काय करायचे! धाराशीवच्या जिल्हाधिकाऱयांचे निवडणूक आयोगाला पत्र
मराठा आरक्षण आंदोलकांकडून लोकसभा निवडणुकीसाठी हजारोंच्या संख्येने उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतदान यंत्राच्या क्षमतेपेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास मतपत्रिकेच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी लागेल. पण मतपत्रिकेवर निवडणूक घ्यायची तर सगळी यंत्रणाच वेगळय़ा पद्धतीने कामाला लावावी लागेल. त्यामुळे योग्य ते मार्गदर्शन करण्यात यावे, असे पत्रच धाराशीवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी राज्याचे निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांना लिहिले आहे.