नमो महारोजगार मेळाव्यात महाझोलझाल!

43 हजारांपैकी 30 हजार जागा ट्रेनी

मोठी जाहीरातबाजी आणि गाजावाजा करून उद्या (दि. 2) बारामतीत होणारा नमो महारोजगार मेळावा म्हणजे मिंधे सरकारचा महाझोलझाल असल्याची माहिती आता पुढे येत आहे. या मेळाव्यातून 43 हजार तरुणांना रोजगार मिळेल, असे सरकारकडून सांगितले जात असले, तरी यातील 30 हजार ट्रेनी पदे आहेत. प्रत्यक्षात नोकऱया नाहीत. हा तरुणांच्या बेरोजगार तरुणांच्या भावनांशी खेळ सुरु असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिह्यातील युवकांसाठी बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा भरविण्यात आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय पुंभार यांनी या नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देण्यात येणाऱया नोकऱयांच्या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. शिकाऊ कामगार किंवा कर्मचारी म्हणून या जागा असून त्यामधून तरुणांची फसवणूक होऊ शकते असा आरोप केला आहे. भोसरी येथील Ligmus Pvt. Ltd. पंपनीमध्ये 15 हजार ट्रेनी घेणार आहे. तर बारामतीची Giles Pvt. Ltd. पंपनी 1 हजार ट्रेनी घेणार आहे. या दोन्ही पंपन्यांचा तपशील इंटरनेटवर काही आढळला नाही. या पंपन्यांच्या नावामध्ये कदाचित स्पेलिंग मिस्टेक असू शकते. Giles Pvt. Ltd ऐवजी Gils Pvt. Ltd ही पंपनी सापडली परंतु आश्चर्य म्हणजे या पंपनीच्या सर्व 9 स्त्र्ााr पुरूष संचालकांची नांवे D. Williamson आहेत, असे पुंभार यांनी सांगितले.

शरद पवार यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत

महारोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार असूनही शरद पवार यांचे नाव टाकण्यात आले नव्हते. त्यामुळे शासनावर चौफेर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर चव्रे फिरली आणि आज सकाळी बारामती येथील विविध कार्यक्रमांची शरद पवार यांचे नाव असलेले निमंत्रण पत्रिका नव्याने काढून वितरित करण्यात आली.

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री म्हणले जेवणाला येता येणार नाही

बारामतीत येत आहात तर गोविंद बागेमध्ये जेवायला या, असे खास आमंत्रण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिले होते. मात्र मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी पूर्वी नियोजित कार्यक्रमांमुळे आपल्याकडे येता येणार नाही, असे पत्राद्वारे कळविले आहे.