गायक एरिक नाम हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीच्या प्रेमात

बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना आणि दक्षिण कोरियन गायक एरिक नाम यांच्यात तीन गोष्टी समान आहेत. दोघेही गायक, गीतकार आणि संगीतकार आहेत. दुसरे म्हणजे त्या दोघांना प्रतिष्ठत टाइम मासिकाने आज जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. तिसरे त्यांचे अन्नावरील प्रेम!

आयुष्मान-एरिकची गेल्या वर्षी पुरस्कारानिमित्त भेट झाली होती. त्यानंतर एरिक जेव्हा हिंदुस्थानात आला तेव्हा आयुष्मानने त्याला संस्मरणीय हिंदुस्थानी खाद्यसंस्कृतीचा अनुभव दिला. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्वोत्कृष्ट पदार्थ दिले. कांदा भजीवर हिरवी चटणी आणि लाल चटणी, पिंडी छोले अमृतसरी कुलचा, हैदराबादी गोश्त की बिर्याणी रायता आणि रसमलाई दिली.

आयुष्मान म्हणतो, ‘‘एरिक हा एक मोठा फुडी आहे. आपला देश वैविध्यपूर्ण पाककलेसाठी जगभरात ओळखला जातो. एरिकला त्याची अनुभूती मिळावी, अशी माझी इच्छा होती.’’