अनेकांच्या मोबाईलवर एक नवीन एसएमएस येत आहे, ज्यामध्ये एका योजनेंतर्गत फक्त आधार कार्डचा वापर करून सरकार स्वस्त व्याजदराने कर्ज देत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा मेसेज फेक असल्याचे दिसून आले आहे.
पीआयबी फॅक्ट चेकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, कर्जाचा जो मेसेज फिरत आहे तो बनावट आहे. सरकारच्या कोणत्याही योजनेच्या अंतर्गत नागरिकांना आधार कार्डवर लोन दिले जात नाही. पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘एका फेक मेसेजमध्ये सरकारच्या स्कीम अंतर्गत आधार कार्डवर फक्त 2 टक्के वार्षिक व्याजावर कर्ज दिले जाईल, असे सांगण्यात येतंय. असा फसवा मेसेज फॉरवर्ड करू नका. हा तुमची खाजगी माहिती चोरण्याचा प्रयत्न देखील असू शकतो.’
हा मेसेज पाठवणारे स्पॅमर असू शकतात आणि तुमची खासगी माहिती चोरू शकतात. त्यामुळे बँक खात्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या पह्न किंवा ईमेलवर जर असा कोणतीही मेसेज आला तर त्यावर क्लिक करून नका. तसेच कुणालाही फॉरवर्ड करू नका.